नाशिकचा सुप्रसिद्ध "मसालेभात "

नाशिकचा  सुप्रसिद्ध  "मसालेभा "

                     लहान मुलांना  आवडेल  असा.


*साहित्य *
• २ वाट्या तांदूळ

• अर्धी वाटी कोणतीही भाजी-मटारदाणे, फ्लॉवरचे तुकडे, चिरलेली कोबी, वांगी, तोंडली, भोपळी मिरच्या, यापैकी काहीच हाताशी नसल्यास ४ कांद्याच्या चौकोनी फोडी

• २ चमचे काजू किंवा शेंगदाणे ( ऐच्छिक)

• ३ हिरव्या मिरच्या

• २ चमचे आमटी मसाला किंवा चमचा गरम मसाला

• १ चमचा धनेजिरेपूड

• पाव चमचा तिखट

• २ मोठे चमचे तेल

• अर्धा चमचा मोहरी

• अर्धा चमचा जिरे

• पाव चमचा हिंग

• अर्धा चमचा हळद

• दीड चमचा मीठ

• ओले खोबरे

• कोथिंबीर

• २ चमचे साजूक तूप

• ४॥ वाट्या गरम पाणी

*कृती *

• तांदूळ धुवून तासभर बाजूला निथळत ठेवावेत. भाजी नीट करून ठेवावी.
• तोंडली किंवा वांगी चिरल्यानंतर पाण्यात ठेवावीत. नाहीतर रापतात ( काळी पडतात).

• पातेल्यात तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे उभे तुकडे घालून त्यावर भाजी घालावी.

• ३-४ मिनिटे परतावेत. गरम पाणी ( या भाताला गार पाणी अजिबात वापरू नये) मीठ मसाला, तिखट इत्यादी सर्व घालून साध्या कुकरमध्ये ४० मिनिटे हा भात शिजवावा.

• भात तयार झाला की झाकण उघडल्यानंतर दोन चमचे साजूक तूप कडेने भातावर घालावे. म्हणजे तांदळाचे दाणे मोकळे दिसतात.



Share on Whatsapp

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राशेगाव शिवारात क्रुझर-ट्रकच्या धडकेत दोन ठार

नाशिकमध्ये दोघांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला