Posts

Good night

Image
Good Night Wish WELCOME  Good Night! Sleep Tight.  I may not be your side,  But know that you are  in my heart   Have a Sweet dreams Share Share

नाशिकमध्ये दोघांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला

Image
नाशिकमध्ये दोघांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला  हल्लेखोरांनी चॉपर, लोखंडी गजाने हल्ला चढविला नाशिक : जुने नाशिक येथील तिवंधा चौकात दोघा मित्रांवर संशयित चार ते पाच हल्लेखोरांनी चॉपर, लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघे युवक जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काही संशयितांची नावे समोर आली असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराज जगदीश जंगम (23 रा. दिल्ली दरवाजा), रोहित पेखळे (23… रा. तिवंधा चौक) हे दोघे रात्री जेवण करून बाहेर कट्ट्यावर गप्पा करत बसले असता संशयीत हल्लेखोर यश खैरे, गणेश खैरे, सौरभ मराठे, अशोक खैरे व त्यांचा एक साथीदार अशा पाच जणांच्या टोळक्याकडून जंगम व पेखळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी परिसरात धावपळ उडाली. हल्लेखोर तात्काळ घटनस्थलावरून फरार झालेत. जखमी अवस्थेत दोघं युवकांना परिसरातील नागरिक, नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त...

राशेगाव शिवारात क्रुझर-ट्रकच्या धडकेत दोन ठार

Image
राशेगाव शिवारात क्रुझर-ट्रकच्या धडकेत दोन ठार शनिवार,2019-08-03 जखमींमध्ये शासकीय अधिका री व कर्मचाऱ्यांचा समावेश पेठ : नाशिक रोडवरील राशेगाव शिवारात क्रुझर आणि आयशर ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. क्रुझरचा चालक बाळू शंकर गांगुर्डे (वय २६, रा. पेठ) जागीच ठार झाला, तर कल्पेश दत्तात्रेय बोरसे (३५, रा. पावरापाडा, नाचलोंडी, ता. पेठ) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींमध्ये नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले आणि पेठ तालुक्यामध्ये कार्यरत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ येथे कार्यरत असलेले व रोज पेठ-नाशिक प्रवास करणारे कर्मचारी नेहमीप्रमाणे नाशिककडे येण्यासाठी निघाले होते. खासगी क्रुझर (एमएच ०४/डीबी ३३४४) वाहनातून ते नाशिककडे येत असताना मालवाहू आयशरने (एमएच १४/एचजी ३६६६) क्रुझरला धडक दिली. राशेगावजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास पूल ओलांडल्यानंतर समोरून भरधाव आलेल्या मालवाहू आयशरने (एमएच १...

नाशिकचा सुप्रसिद्ध "मसालेभात "

Image
नाशिकचा  सुप्रसिद्ध  " मसालेभा त "                       लहान मुलांना  आवडेल  असा . * साहित्य * • २ वाट्या तांदूळ • अर्धी वाटी कोणतीही भाजी-मटारदाणे, फ्लॉवरचे तुकडे, चिरलेली कोबी, वांगी, तोंडली, भोपळी मिरच्या, यापैकी काहीच हाताशी नसल्यास ४ कांद्याच्या चौकोनी फोडी • २ चमचे काजू किंवा शेंगदाणे ( ऐच्छिक) • ३ हिरव्या मिरच्या • २ चमचे आमटी मसाला किंवा चमचा गरम मसाला • १ चमचा धनेजिरेपूड • पाव चमचा तिखट • २ मोठे चमचे तेल • अर्धा चमचा मोहरी • अर्धा चमचा जिरे • पाव चमचा हिंग • अर्धा चमचा हळद • दीड चमचा मीठ • ओले खोबरे • कोथिंबीर • २ चमचे साजूक तूप • ४॥ वाट्या गरम पाणी * कृती * • तांदूळ धुवून तासभर बाजूला निथळत ठेवावेत. भाजी नीट करून ठेवावी. • तोंडली किंवा वांगी चिरल्यानंतर पाण्यात ठेवावीत. नाहीतर रापतात ( काळी पडतात). • पातेल्यात तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे उभे तुकडे घालून त्यावर भाजी घालावी. • ३-४ मिनिटे परतावेत. गरम पाणी ( या भाताला गार पा...

चमचमीत गरमागरम "भेळ पोहे "

Image
            चमचमीत  गरमागरम  "भेळ पोहे "                       सकाळच्या  नाश्ता करिता उत्तम  पदार्थ     * साहित्य     * • ५-६ वाट्या पातळ पोहे • आतपाव खारे दाणे • ५० ग्रॅम शेव • ३-४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे • अर्धे लिंबू • २ मध्यम कांदे • थोडी कोथिंबीर • खोबरे • साखर • मीठ * कृती    * • तुपाची हिंग-जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू नये.) • नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत. • चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत. • कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन भेळेसारखे कालवावे. • ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते. • चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी. टीप:  आपल्या  प्रतिक्रिया अवश्य कळवा.  Share on Whatsapp